News Corner
Stay updated with the latest news from SES Pharmacy College
श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली येथे औषध निर्माता दिन मोठ्या उत्साहात व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरा करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देवगड बीचवर स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न देवगड, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली यांच्या वतीने नगरपंचायत देवगड-जामसंडे यांच्या सहकार्याने देवगड बीच येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धन, समुद्रकिनारा स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, टोंडवली येथे आयोजित विशेष मार्गदर्शन सत्रामध्ये डॉ. रूबेन ब्ल्यूथेलो यांनी फार्मसी विद्यार्थ्यांना भविष्यातील फार्मास्युटिकल उद्योगातील संधी, बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावरील करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कणकवली : APTI – TVISHA–2.0 (कोकण विभाग) अंतर्गत सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली, कणकवली येथे दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी आंतरमहाविद्यालयीन कोकण विभागीय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

